एक हाक संस्कृतीसाठी...एक हात भलरसाठी
'भलर' एक आदिवासी त्रैमासिकाला आर्थिक मदत करण्याचे जाहीर आवाहन
आपण सर्व भारतातील लोक...संस्कृती संवर्धनाचे महत्त्व आता ओळखू लागलो आहोत. नव्हे नव्हे आपण तर संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्न करत आहोत. प्रत्येकालाच या कामात स्वतंत्र असा वेळ देणे शक्य असेल असे नाही. परंतु आपल्यातीलच काही जन या कामात पूर्णवेळ काम करत आहेत. अशा प्रयत्नांतील एक नाव म्हणून आपण आदिवासी साहित्यक्षेत्रात 'भलर"चे नाव घेऊ शकतो.
संस्कृती संवर्धनावर बोलणे कदाचित आजच्या माहिती संप्रेशणाच्या युगात सोपे आहे. परंतु रोजी रोटीच्या प्रश्नासाठी घराबाहेर पडणा-या प्रत्येक व्यक्तीला संस्कृती संवर्धनाच्या कामात प्रत्यक्ष उतरणे शक्य असेल असे नाही. आपणास खात्रीशीरपणे माहीत आहे कि जगाला वाचवायचे असेल तर भारतातील आदिवासी संस्कृती व जीवनशैली यांना खूप महत्त्व आहे. विकासाच्या नावाखाली एकीकडे आदिवासी क्षेत्रात आक्रमण होत असताना 'भलर'च्या माध्यमातून आदिवासी साहित्याच्या माध्यमातून डोंगर द-यातील माणसाचं जगणं शब्दबध्द करून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदिवासी समाजात अधिक साहित्यिक उदयास यावेत यासाठी एक माध्यम म्हणून 'भलर' स्थापन करण्यात आलेले आहे.
आज भारतात जवळपास १० कोटीच्या आसपास आदिवासी लोकसंख्या आहे. शिक्षण, साहित्य या क्षेत्रात जर आपण बघितले तर आदिवासी जगण्याचे प्रतिबिंब खुपच त्रोटक दिसते. हीच परिस्थिती अजून काही काळ सुरु राहिली तर येणा-या आमच्या पिढ्यांना आम्ही आदिवासी म्हणजे काय? हे प्रत्यक्ष अनुभवातून सांगू शकणार नाही. हा धोका ओळखून आज आदिवासींनी स्वता पुढाकार घेऊन आपल्या जगण्याची सांस्कृतिक मौलिकता मांडणे आवश्यक आहे. आदिवासी इतिहास, संस्कृती, गाणी, कथा, कविता, परंपरा, जीवनशैली, पेहराव, आरोग्य, खाद्यसंस्कृती, शिक्षण अशा विविध विषयांवर लिखाण व्हावे या दृष्टीकोनातून आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र यांच्या पुढाकारातून 'भलर' या आदिवासी त्रेमासिकाची सुरुवात ऑगस्ट २०१६ पासून करण्यात आलेली आहे. हे त्रैमासिक तळागाळात पोहचविण्यासाठी आपल्या सर्वांच्या आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे.
आपल्या आजच्या आर्थिक सहकार्यातून आपण आदिवासी इतिहासाला जगासमोर आणण्यास मोलाची मदत कराल व याच आपल्या औदार्यातून समाजहित जोपासण्याची अभिनंदनीय परंपरा सुरु कराल.
आपणास 'भलर' या आदिवासी त्रेमासिकाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पुढील व्यक्तींशी संपर्क करू शकता.
१) राजू ठोकळ - 9890151513
२) मयूर नवाळे - 9594650790
३) अरुण पारधी
४) मुकुंद साबळे
५) शशिकांत करवंदे
६) भाऊ गंभीरे
आमच्या हाकेला साथ द्या....समाजाच्या हिताला साथ द्या
www.bhalar.blogspot.in
0 comments:
Post a Comment