‘IBN लोकमत’ने फोडली अन्यायाला वाचा, खामगाव प्रकरणी SITची स्थापना
03 नोव्हेंबर : खामगाव आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास केला जाणार आहे असे आदेशच पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिले आहे. या प्रकरणाचा आयपीएस श्वेता खेडकर तपास करणार आहे.बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील नीनाजी कोकरे आश्रमशाळेत 5 आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या बलात्कारप्रकरणी आश्रमशाळेच्या 7 कर्मचायांना अटक करण्यात आलीये. तर 3 जण फरार आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस अधिकारी श्वेता खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आलीये. आश्रमशाळेच्या 10 कर्मचायांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे अत्याचार पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शेगाव इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी आरोपींवर बलात्कार, ऍट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
कुणाकुणाला ताब्यात घेतलं होतं ?
गजानन कोकरे, आश्रमशाळेचा अध्यक्ष
पुरुषोत्तम कोकरे, संस्थेचा सचिव
आंबोरे, आश्रमशाळेचा मुख्याध्यापक
लाहूडकर, आश्रमशाळेचा कर्मचारी
गजानन भालेराव, आश्रमशाळेचा कर्मचारी
रवी डांगरे, आश्रमशाळेचा कर्मचारी
दीपक कोकरे, आश्रमशाळेचा कर्मचारी
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
खामगाव आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी 7 जणांना अटक
बुलडाणा, 03 नोव्हेंबर : राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावातील आदिवासी आश्रमशाळेतल्या 5 मुलींवर बलात्कार झालाय. खामगावच्या निनाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आलीये. मात्र, 3 आरोपी अजूनही फरार आहे.खामगावच्या याच नीनाजी कोकरे आश्रमशाळेत आदिवासी मुलींवर बलात्कार घडल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या मुली दिवाळीच्या सुट्टीत गावी गेल्यानंतर या प्रकरणाला खयाअर्थाने वाचा फुटलीय. पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार आश्रमशाळेतील 8 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर येतंय.
या अत्याचाराविरोधात तक्रार दाखल होताच पोलिसांनी 10 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. चौकशीनंतर 7 जणांना अटक करण्यात आलीये. माजी आमदार नानाजी कोकरे यांची ही आश्रमशाळा असून तिथं अनेक आदिवासी मुली शिक्षण घेतात तरीही तिथं महिला अधिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशातच हा बलात्काराचा गुन्हा उघडकीस आल्याने आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेचा आलाय.
काय आहे घटनाक्रम?
– निनाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळा, पाळा (खामगाव)
- शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा
- आश्रमशाळेत एकुण 105 मुली शिकत आहे
- जळगाव, अकोला, बुलडाण्यातील मुली या आश्रमशाळेत आहेत
- दिवाळीत सुट्टीवर गेलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथल्य़ा मुलींनी बलात्कार झाल्याची बाब पालकांना सांगितली
- बुधवारी रात्री एकनाथ खडसे यांच्याकडे या पिडीत मुलीच्या पालकांनी भेटून तक्रार केली
– खडसे यांनी रात्री उशिरा पाडूरंग फुंडकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली
- त्यानंतर सूत्र वेगाने हालली, फूंडकरांनी पोलिसांना ताबडतोब कारवाई करण्याच्या सुचना दिल्या
- एका पीडित मुलीच्या तक्रारीवरुन दुपारी खामगाव पोलिसांनी गुन्हे दाखल
- खामगाव पोलिसांनी आतापर्यत 16 जणांना ताब्यात घेतलंय
- सर्वच्या सर्व आश्रमशाळेचे कर्मचारी,अधिकारी
– या सर्वांची चौकशी सुरू
- चौकशीनंतर 7 जणांना अटक
http://www.ibnlokmat.tv/archives/235297
--------------------------------------------------------------------------------------------------------------
'बुलडाण्यातल्या आश्रमशाळेत दहा ते बारा मुलींवर बलात्कार'
बुलडाणा : बुलडाण्यातल्या आश्रमशाळेत तब्बल डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी पाच मुलींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, पण सरकार हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही मलिक म्हणाले आहेत.
याप्रकरणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/dozen-students-raped-in-buldana-ashram-shala-alleges-nawab-malik/336088
0 comments:
Post a Comment