डॉ. गोविंद मोघाजी गारे आदिवासी समाजाचे चालते बोलते संसदीय लोकसभागृह आणि चालते बोलते संग्रहालय होते.
डॉ . गोविंद गारे यांचा जन्म 4 मार्च 1939 रोजी निमगिरी गावी जुन्नर तालुक्यात झाला. त्यांच्या आई हिराबाई व वडील मोघाजी तसे पाहता दोघेही अशिक्षितच, वडिलांचे छायाछत्र तर डॉक्टर लहान होते तेव्हाच हरवले. त्यामुळे वडिलांचे प्रेम नाही मिळाले; पण आई हिराबाई यांनी कसली हि कमी पडू नाही दिली. त्यांनी सहाही भावंडांची प्राथमिकपर्यंत ची शिक्षण आन पालनपोषणाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. आई म्हणजेच डॉक्टरांचा प्रेरणा स्थान होत, त्यांच्या प्रेरणेनेच पुढील शिक्षण त्यांनी सुरु ठेवलं. चौथी पर्यंत गावातीलच शाळेत राहून शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्यांनी जुन्नरचा रस्ता धरला. त्यानंतर पुढील पदवी शिक्षणासाठी त्यांनी संत ज्ञानेश्वर वसतिगृह येथे राहून फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिक्षणास प्रारंभ केला. या काळात त्यांची ओळख जेष्ठ पत्रकार तसेच खासदार अनंतराव पाटील यांच्याशी झाली. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी 'विशालसह्याद्री' या वर्तमाणपत्रातून आपली लेख माला "मावळाची मुशाफिरी" लिहिण्यास प्रारंभ करून आपल्या लिखाण विश्वाची सुरवात केली. या लेखमालेला खुप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर कधीच मागे न पाहात त्यांनी आदिवासी समाजावर भरपूर असे लिखाण करून साहित्याचा डोंगर उभा करून दिला. त्यांचे तीनही भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी यांवर प्रभुत्व होते.
डॉक्टरांनी पुण्यात श्री. संजय गाडगीळ आणि डॉ. वि. मा. दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीचडी पूर्ण केली. त्यांच्या प्रबोधनाचे नाव (Tribals In An Urban Settings A Study Of Mahadev Koli) त्यानंतरच त्यांचे आदिवासी महादेव कोळी समाजाचे असणारे संविधान आन धर्मंग्रन्थ म्हणले तरी चालेल असे पुस्तक म्हणजे सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी हे पुस्तक 24 मार्च 1974 रोजी प्रकाशित झाले. आज या पुस्तकाच्या प्रति कमी मिळत आहेत. याच पुस्तकाला 1974-75 सालचे मराठीतील समाजशास्राचे प्रथम पुरस्काराने नामांकित केले. डॉक्टरांची बहुतेक पुस्तके हि श्री विद्याप्रकाशन यांनी प्रकाशित केली आहेत. तसेच कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांनी ही प्रकाशित केली आहेत. आज त्यांची 50 पेक्षा हि जास्त पुस्तके प्रकाशित आहेत. काही पुस्तकांची प्रतीक्षा त्यांच्या मुलीकडून आहे . हे सर्व साहित्य आदिवासी समाजाला समोर ठेवून लिखाण करण्यात आलेले आहे. आदिवासी समाजावर अभ्यास आन लिखाण असच त्यांचं जीवन होत. त्यांच्या लिखाणासाठी त्यांनी आजपर्यंत 14 विविध पारितोषक मिळवली आहेत. डॉक्टर प्रथम नागरिक होते ज्यांना आदिवासी समाजाच्या अभ्यासासाठी ब्रिटिश कोन्सिल ची फेलोशिप मिळाली होती. त्यानंतर त्यांनी इंग्लडला एक वर्ष अभ्यास करून पदविका मिळवली होती.
तिथून परतल्यानंतर त्यांची नियुक्ती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे संचालक पदासाठी नियुक्ती झाली. तेथे त्यांनी 13 वर्षे काम केलं. या वेळात त्यांनी मुख्य म्हणजे प्रामुख्याने आदिवासी संग्राहल्याची निर्मिती केली. शासनाकडे अनेक अभ्यासपूर्ण मुद्दे व शिफारशी केल्या, प्रामुख्याने आदिवासी भागात होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी माहिती व बोगस जमात प्रमाणपत्र प्रतिबंध कायदा क 23 /2001 हा एक मताने पास करून घेतला.
शेवट पर्यंत फक्त खऱ्या आदिवासींना न्याय मिळावा म्हणून ते लढत राहिले. हे काम करत असताना त्यांना व कुटुंबियांना देखील खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांना या कालावधीत खूप धमकीचे पत्र आले, त्यात जीवे मारण्याच्या धमक्या देखील होत्या. परंतु डॉक्टरांनी या सर्व गोष्टींकडे परिणामाचा विचार न करता दूर सारत आपल्या कामाकडे लक्ष देत सर्व सुरळीत सुरु ठेवले. या स्थितीत त्यांना भरपूर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले . त्यांच्या उत्कृष्ठ सेवेसाठी शासनाने त्यांना प्रशासन सेवेत IAS साठी शिफारस केले आणि 1987 साली त्यांनी लातूर जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला, त्यानंतर औरंगाबाद मध्ये आयुक्त व नंतर ठाणे येथे अप्पर आयुक्त म्हणून पदभार सांभाळला..
ते 31 मार्च 1997 ला सेवानिवृत्त झाले. तरी देखील त्यांनी काम करणे सोडलं नव्हते..
0 comments:
Post a Comment