भलर'च्या दुस-या अंकाचे वितरण सुरु....
आदिवासी साहित्याला आपल्या मनात जागा मिळावी या अट्टाहासातून टाकलेले आदिवासी विचार मंचाचे हे धाडसी पाऊल आता कात टाकत आहे. या कामात आम्हाला साथ हवीय समाजाची आणि सोबत तुमची....!
शिक्षण विषयक विविध दृष्टिकोनातून साकारलेला हा दुसरा अंक अधिक प्रभावी बनविण्यासाठी निखिल आहेर यांनी मुखपृष्ठ बनवून दिले. तसेच मयूर नवाळे याने रात्रीचा दिवस करून अक्षर जुळवणी केली. आदिवासी विचार मंचच्या संपूर्ण टीमने एक विश्वास दिल्याने अनेकांनी खूपच सुंदर व अर्थपूर्ण लेख आम्हास पाठविले. काहींनी पाठविलेले अनुभव तर आमच्यासाठी पथदर्शी आहेत. भलरचा दुसरा अंक सर्वांच्या लेखांना समाविष्ट करू शकला नाही याबाबत प्रांजळपणे काही मित्रांची माफी मागतो. परंतु समाजासाठी समाजाचे विचार आपण पुढील अंकातून नक्की अधिक सक्षमपणे प्रकाशित करू.
रोहिदास वाजे, कृष्णकांत भोजणे, संतोष मुठे, विजय रढे, प्रभाताई फलके, किरण डोंगरदिवे, राहुल भांगरे, अविनाश दुबळा, प्रियांका ईदे, प्रवीण धांडे, सुनील पावरा, पद्मनाम साबळे, चंद्रकांत घाटाळ, दिनेश भोईर या सर्वांच्या विचारांतून काही प्रमाणात आदिवासी शिक्षणाच्या बाबतीत समाजात मंथन सुरु करण्याचा लहानसा प्रयत्न केला आहे......!
अंक तयार करणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्याचे वितरण महत्त्वाचे आहे. यातून आमच्या विभागीय प्रतिनिधींनी हि जबाबदारी पेलण्याचा शब्द दिल्याने आम्ही हे काम पूर्णत्वास नेऊ शकलो.
आदिवासी साहित्य आणि समाजातील संस्कृती संवर्धन या पातळीवर काम करताना 'भलर'मधील काही त्रुटी आपण मोठ्या भावा-बहिणीप्रमाणे आपण आमच्या लक्षात आणून द्याल हि विनंती.
-राजू ठोकळ
#भलर
www.bhalar.blogspot.in
Book your Own as soon as possible
0 comments:
Post a Comment