आतल्याची गंगी
पाटलाचा सम्या नेहमी आतल्याच्या गंगीमागं हिंडायचा. दोघं गुरांकं रावणाच्या माळावर गेल्यावर पक्की गुलु गुलु बोलायची. आतल्याची गंगी म्हणजे लाखात एक....सा-या प्याहरात शोधून गावणार नाय अशी लाडकी लेक व्हती. पाटलाचा सम्याही तसा मोठा रुबाबदार देखणा गडी. बापाच्या लाडात वाढलेला पण शिक्षणात मार खाल्ला. गंगीच्या नादाला लागला आणि साळेत जाणारे पाय नदीच्या पल्याड असणा-या रावणाच्या मळ्याकडं वळत असत. त्यामुळं दोघांचंही शिक्षाण बोंबाललं व्हतं. आता त्यानला ती नदी आणि तो रावणाचा माळ म्हणजे सोन्याची लंकाच भासत व्हती....कारण तिथं त्यांच्या प्रेमात कोणी अडथळा बनत नव्हतं.
मांजरानं दूध डोळं झाकून पेलं म्हणजे त्याची खबर जगाला लागत नाही असं होत नही. सम्या आणि गंगीच्या बाबतीत तसंच घडलं. आतल्याला आपल्या पोरीच्या प्रेमाची कुणकुण लागली व्हती. गावात कुत्री मारत हिंडणा-या उद्धवनं आपल्या लंगोटी मित्राला त्याच्या पोरीच्या प्रेमाची खबर दिली होती.
आपली गंगी असं काय करील यावर सुरुवातीला इश्वास बसत नव्हता....पण उद्धव खोटं बोलल असंही नव्हतं. गंगीला कसं समजावायाचं या चिंतेत आतल्या तासनतास इचार करू लागला. तसा तो पोरीच्या प्रेमाला इरोध करीत नव्हता. पण आपुन आदिवासी आणि तो पाटील मोठ्या जातीतील....आपलं काय संबंध जुळणार नाहीत. परत उद्या आपल्याच इभ्रतीचा पंचनामा व्हयाचा या भीतीत आतल्याचं आपल्या कामावर ध्यान लागत नव्हतं.
आपल्याला यातून काही तरी मार्ग काढाया पाह्यजे नाय तर पोर हातची जायाची आणि चार चौघात तोंड दाखवायला जागा नै रह्याची म्हणून आतल्यानं साबळ्यांच्या मुकुंदाला मनातली सल बोलून दावली. कारण तो एकच चार अक्षरं बरी शिकेल व्हता.
........पुढील कथा वाचू निवांत.....गंगीचं लगीन ठरल्यावर.
वाचा भलर....बोला भलर....लिहा भलर
bhalarmasik@gmail.com
0 comments:
Post a Comment