भूसंपादन

कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन रोखणार

२७ गावांच्या जमिनी पेसाच्या अडकित्त्यात : वैती, पंदण, पारगाव धुकटण आणि वसरोलीकरांची तयारी, संघर्ष समितीही ठाम

पुरुषांच्या बरोबरीला महिलाही रस्त्यावर

शुभदा सासवडे पालघर/सफाळे

वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे रस्त्याखालील २७ ग्रामपंचायतीचे क्षेत्र पेसा अंतर्गत येणार असल्याने स्थानिकांच्या जमिनी मोठया प्रमाणात जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भुमापन करून देणार नाही असा इशारा शेतकरी संघर्ष समिततीने दिला आहे. या कामासाठी वैती, पंदण, पारगाव धुकटण आणि वसरोली या पाचा गावांची निवड करण्यात आली आहे.
नावझे येथे नुक त्याच झालेल्या बैठकीत भुमापन न होऊ देण्याचानिर्णय घेण्यात आला. या बाबत पालघर येथील उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. १ जानेवारी २0१७ पासून केंद्र सरकार वडोदरा-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाला सुरूवात करणार आहे. पालघर जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने या रस्त्याला कडाउून विरोध केला असून जनजागृती केली जात आहे. सुमारे ३८0 किलो मिटरचा हा रस्ता ३0 फुट उंचावर असणार आहे.
नावझे आणि अन्य गावात पाच महिन्यांपूर्वी भुमापन करण्यासाठी आलेलैया काही अधिकार्‍यांना शेतकरी आणि शेतकरी संघर्ष समितीने माघारी पाठवले होते. द्रुतगती महामार्गासाठी अनेक शेतकर्‍यांच्या समिनी संपादित केल्या जाणार असून काही जणांना तर आपली स्वत:ची घरे देखिल गमवावी लागली आहेत. त्यामुळे या गावातील स्थानिक लोकांनी या प्रकल्पला कडाडून विरोध केला आहे. असा ठराव सुध्दा ग्रामस्थांनी पालघर उपविभागीय अधिकार्‍यांना दिला आहे.
पारगाव, वैती, पेणद, धुकटण आणिवसरोली या पाच गावांत भुमापन होऊ दिले जाणार नाही असा निर्णय या पार्श्‍वभुमीवरून संघर्ष समितीने घेतला आहे. तसे निवेदन उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांना सादर केले. भुमापनाबाबत शेतकर्‍यांना नोटीस दिलेली नाही. शेतातून मापन केल्यास भाताच्या पिकाचे नुकसान होईल. त्याची झालेली नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांच्या बळावर कोणत्याही परिस्थित भुमापन करू दिले जाणार नाही असा निर्धार शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष विo्राम पावडे यांनी व्यक्त केला आहे. भूमीच्या रक्षणासाठी ऊन, तहान, भुक याची तमा न बाळगता सकाळी सकाळी नऊच्या सुमारास घरातील पुरुष मंडळीच्या सोबत पदर कंबरेला खोचून महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. स्थानिक लोकांच्या भावना दुखावणारया आणि त्यांच्या विकासासाठी उपयोगी न ठरणार्‍या वडोदरा- मुंबई एक्स्प्रेस वे च्या भूमापनाला शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार विरोध करण्यासाठी गुरुवारी शेकडो शेतकरी पुरूष व महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. गुरु वारी पारगाव, पेणंद, वैती , धुकटण आणि वसरोली या गावांमध्ये भूमापनासाठसाठी उपविभागीय अधिकारयांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात भूमापन अधिकारी , तलाठी व इतर कर्मचारी येणार होते. ही मोजणी कोणत्याही परिस्थितीत होऊ नये तसेच आमची जागा या प्रकल्पासाठी देण्यास शेतकरी तीव्र विरोध दर्शवित असतांनाही जबरदस्तीने भूसंपादन करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. वरील ठिकाणी गुरु वारी सकाळ पासूनच शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. वरील सर्व गावे पैसा कायदा अंतर्गत येणार्‍या ग्राम पंचायत च्या हद्दीत येत असल्याने या ग्रामपंचायतीने त्या विरोधात ठराव करून उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांना दिले होते. मात्न सर्व ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीचा विरोध पाहून कोणीही अधिकारी आले नाहीत. यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पावडे व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .


0 comments:

Post a Comment

 

Popular Posts

प्रतिक्रिया...

भलरत्रैमासिक हे आदिवासी समाजासाठी असून त्यात आपणास सुचणारे अपेक्षित बदल सुचविण्याचा अधिकार सर्वांना आहे. आपल्या सुचना किंवा प्रतिक्रिया bhalarmasik@gmail.com वर किंवा ९८९०१५१५१३ या नंबरवर Whats App करा.

Total Pageviews

Vidrohi Adivasi

Followers